अहिल्यानगर : जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व व मान्सूनच्या परतीच्या पावसाने एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने २२ जणांचा मृत्यू झाला तर ५ हजार ६९७ घरांची पडझड झाली. लहान-मोठे असे १ हजार ५९ जनावरे दगावली. शिवाय १३ हजार ८७९ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

जिल्ह्यास यंदा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी, पूर, वादळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाचे प्रमाण नगर दक्षिण जिल्ह्यात अधिक होते. सर्वाधिक घरांचे नुकसान हे पाथर्डी तालुक्यात, १ हजार २० घरांचे झाले तर जामखेड तालुक्यात ९०६ घरांची पडझड झाली आहे.

या पावसात ३ हजार १७१ घरांचे अंशत: तर २ हजार १७८ घरांचे नुकसान झाले. ६ ठिकाणी संपूर्ण घरांचे नुकसान झाले. यासह ३४२ ठिकाणी जनावरांचे गोठे पडले आहेत. यासह शेवगाव तालुक्यात सर्वाधिक लहान-मोठ्या ओढकाम करणारे ४१८ जनावरे दगावली असून, नगर तालुक्यात २९२ जनावरे दगावली आहेत.

तालुकानिहाय मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पुढीलप्रमाणे :

नगर- ३, जामखेड- २, अकोले- १, कर्जत- १, नेवासा- ३, पाथर्डी- ३, राहुरी- १, संगमनेर- ३, शेवगाव- २, श्रीगोंदा- १, राहाता – २. घरांच्या नुकसानीची संख्या पुढीलप्रमाणे: नगर- ५२२, अकोले-१४२, जामखेड-९०६, कर्जत- २०९, कोपरगाव-९२, नेवासा-५६५, पारनेर-१०१, पाथर्डी-१ हजार २०, राहुरी-३९६, संगमनेर-२२७, शेवगाव-९२१, श्रीगोंदा-२४९, श्रीरामपूर- ८४, राहाता- २०३.

दगावलेल्या जनावरांची संख्या :

नगर- २९२, अकोले-१४, जामखेड-९८, कर्जत-२७, कोपरगाव-१६ नेवासा- ३६, पारनेर- २६, पाथर्डी-४०, राहुरी- १३, संगमनेर-३०, शेवगाव-४१८, श्रीगोंदा- २२, श्रीरामपूर-१२, राहाता-