महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.
पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे. Read More
कर्नाटक सरकारचे ”अलमट्टी” धोरण पूर वाढवणारे असून, अलमट्टी धरणाची जलपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५०९ मीटरवर ठेवावी, अन्यथा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात…
बहूचर्चित हणबरवाडी- धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यातून हणबरवाडी उपसा सिंचन…
अवसायानातील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (बहुराज्यीय) उर्वरित ठेवीदारांना, पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना, ठेव पावतीच्या ५० टक्के…
आषाढी वारीसाठी पंढरपूरपर्यंत पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पैशांची गरज लागल्यास कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेने ‘वारकरी बँक’अशी अभिनव योजना सुरू…
कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन्यजीव विभागाने निर्बंध घातले आहेत. एका वेळेला ठरावीक संख्येनेच पर्यटकांना अभयारण्याच्या क्षेत्रात प्रवेश दिला…