Nashik-Gujarat highway Accident :गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहाटे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एस.जी. पाटील यांनी दिली आहे. अपघात झालेल्या बसमध्ये ४८ प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून खोल दरीत कोसळली, असेही त्यांनी सांगितले.

बसमधील ४८ भविकांना घेऊन बस नाशिकत्या त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे जात होती, यादरम्यान हा अपघात झाला. दरम्यान बसमधील भाविक हे मध्य प्रदेशमधील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 people died 15 seriously injured nashik gujarat highway saputara accident marathi news rak