Python in Chandrapur Hotel : महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी बटाट्याच्या पेटीत ८ फूट लांबीचा अजगर आढळला आहे. चंद्रपूरजवळील लोहारा येथील हॉटेलमध्ये हा अजगर आढळला आहे. यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हॉटेलमधील एका बटाट्याच्या पेटीत हा साप होता. हॉटेलमधील कर्मचारी पेटीतील बटाटा काढण्यासाठी गेला असता त्याला हा साप दिसला. पेटीत बटाट्यांच्यावरच वेटोळे घालून हा अजगर बसला होता. हा भलामोठा साप पाहताच कामगार पळून गेला आणि त्याने हॉटेलमालकाला यासंदर्भातील माहिती दिली.
चंद्रपूरच्या एका हॉटेलच्या बटाटाच्या पेटीत आढळला भलामोठा अजगर pic.twitter.com/ygucGgx2LD
— Viral Content (@ViralConte97098) September 11, 2024
हेही वाचा >> जिवंत साप पकडला, धुतला अन् खाल्ला; जेलमधून बाहेर येताच गुंडाचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून थरकाप उडेल
हॉटेल मालकाने तातडीने स्थानिक सर्पमित्राला याची माहिती दिली. त्याने बटाट्याच्या पेटीतून साप गोणीत टाकला. त्यानंतर त्याला लोहारा जंगलात सोडण्यात आले.