राहाता: शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी दुबई येथील एका साईभक्ताने २७० ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ‘ॐ साई’ हे नाव आज, सोमवारी अर्पण केले. या सुवर्ण दानाची किंमत २४ लाख ८४० रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
साईचरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देतात. आज दुबईस्थित एका हॉटेल व्यावसायिकाने २४ लाखांचे सुवर्ण ‘ॐ साई’ साईबाबांच्या चरणी अर्पण केले.
हेही वाचा
साईबाबा नेहमीच द्वारकामाई बसत असल्याने ॐ साई ही सुवर्ण अक्षरे द्वारकामाई येथे बसविण्यात आली. यावेळी संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. या भक्ताने आपले नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.