कृष्णा नदीतील ढवळी येथे घेतलेल्या वाळू ठेक्याच्या हद्दीवरून झालेल्या वादानंतर पोलीसांनी रविवारी सकाळी हत्यारासह दोघां तरुणांना पकडले. या वेळी भांडणाच्या उद्देशाने स्काíपओ मधून दोन चाकूसारखे घातक हत्यार नेण्याच्या प्रयत्नात या दोघांना पकडण्यात आले.
ढवळी (ता. मिरज) येथे वर्धमान अवधूत व अण्णा सायमोते यांनी वाळूचे ठेके घेतले आहेत. वाळूच्या हद्दीवरून दोन गटांत शनिवारी रात्री वादावादी झाली होती. या ठिकाणी पुन्हा रविवारी वाद होणार असल्याची माहिती उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांना मिळाली. शहर व ग्रामीण पोलिसांनी ढवळी येथे सापळा लावला असता ओंकार सुधाकर आरते व विशाल श्रीपाल चौगुले (रा. कसबे डिग्रज) या दोघांना हत्यारासह स्काíपओ (एम एच १० एएन ९५२२) गाडीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-03-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caught both argument over sand contract bound