प्रियकराने लग्नास नकार दिल्याने चंद्रपूरमधील एका मुलीने मंगळवारी ‘शोले’स्टाईल विरूगिरी करीत चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूरमधील वेकोली कॉलनीमध्ये हा प्रकार घडला.
संबंधित मुलीचे एका मुलावर प्रेम आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. मात्र, प्रियकराने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या तरुणीने कॉलनीतील इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून सर्वांचे लक्ष वेधले. मुलाने लग्न करण्यास होकार दिल्यावरच आपण खाली उतरू, असे तिने म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. या ठिकाणी पोलीसही दाखल झाले असून, ते मुलीला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करताहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur girl stands on a water tank for marriage demand