शिवसेनेच्या ३९ बंडखोर आमदारांच्या पाठींब्यावर भाजपाने स्थापन केलेलं सरकार स्थापन केलं सरकार हे उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाचं हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल असं म्हटलं आहे. यामागील कारणाबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण एकनाथ शिंदेंनी…

मुलाखतीमध्ये शिंदे यांना हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वाटतं का?, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “पुढील अडीच वर्ष हे सरकार नक्की चालणार कारण आमच्याकडे ५० आमदार आहेत. भाजपाचे ११५ ते १२० जण आहेत. आमच्याकडे एकूण १७० आमदार आहेत. ज्यांच्याकडे बहुमत असतं ते सरकार कार्यकाळ पूर्ण करतं. एक मजबूत सरकार राज्याला मिळालं आहे. हे सामान्य जनतेच्या मनातील सरकार आहे,” असं शिंदे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> “२०१९ मध्येच भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर…” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, “आम्ही कुठे…”

पुढे बोलताना, “ही (भाजपा आणि शिंदे गट) नैसर्गिक युती आहे. आम्ही बाळासाहेबांचं हिंदूत्व, विकासाचा मुद्दा पुढे घेऊन चाललोय. जे प्रकल्प सुरु आहेत ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं आमचं लक्ष्य आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला त्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आहे,” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> सकाळीच आलेला अमित शाहांचा फोन, मराठा- ब्राह्मण समीकरणं अन् फडणवीसांच्या हातून निसटलेलं मुख्यमंत्रीपद; जाणून घ्या घटनाक्रम

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> “मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी…”; महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं वक्तव्य

“काँग्रेसचं म्हणणं आहे की हे ईडीचं म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे,” असं म्हणत पत्रकाराने शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावरुन प्रिक्रिया देताना शिंदेंनी, “यावर मी काही बोलू इच्छित नाही. आमचे ते ५० आमदार वेगळी भूमिका स्वीकारतात. ते सत्तेतून बाहेर जातात. सामान्यपणे कोणी सत्ता सोडू पाहत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचं कारण काय आहे? याचं सर्वांनी आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला.

नक्की वाचा >> “BJP आणि RSS ला विचारलं पाहिजे, फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय का?”

“आमदारांना अडीच वर्षात जे अनुभव आले ते पाहता त्यांनी एक नवा मार्ग निवडला. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे. मात्र त्यांना ती करता येत नव्हती. सरकारमध्ये असूनही काम करता येत नव्हती म्हणून ते नाराज होतो आणि त्यामुळेच ते बाहेर पडले,” असंही शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde says the government will complete 2 and half year tenure because we have majority scsg