मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याचा शेवट सर्वांना धक्का देणारा ठरला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला असला तरी शिवसैनिकांचा एक मोठा वर्ग त्यांच्यावर नाराज असल्याचं चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ‘CMO MAHARASTRA’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबूक खात्यावरून एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी यावर प्रतिक्रिया देत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तर काहीही अनफॉलो करत निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्टला आतापर्यंत १६ हजाराहून अधिक लाइक्स मिळाले असून जवळपास तीन हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील बहुतांशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील आहेत. अवेकांनी त्यांना गद्दार म्हटलं असून अनाजी पंत या इतिहासातील व्यक्तीशी तुलना केली आहे. ‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री मानत नाही, आम्ही उद्धव ठाकरेंचेच समर्थक आहोत,” अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया संबंधित पोस्टवर आहेत.

“लांडग्याला वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे तो वाघ होत नाही”, “सगळेच दाढीवाले धर्मवीर आनंद दीघे नसतात, काही गद्दार एकनाथ शिंदे देखील असतात”, “हिंदुहृदय सम्राटाच्या मुलाला पायउतार करून काय मिळवलं,” असा सवाल देखील काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.

पाहा एकनाथ शिंदेंच्या शाखाप्रमुख ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासाचा व्हिडीओ –

याशिवाय काहींही मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन देखील केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comments on cmo maharashtra official page after eknath shinde photo post as chief minister rmm
First published on: 02-07-2022 at 00:51 IST