आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठलभक्तांचा मेळा रंगला आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या घेऊन वारकरी पंढरपूरमध्ये पोहचले आहेत. तर मुंबईसह राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजाही पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनीही व्हिडीओ पोस्ट करत आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे दोघेही विठ्ठलाच्या फोटोसमोर उभे आहेत. “पुंडलिक वर दे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय” असं म्हणत हे दोघंही शुभेच्छा देत आहेत. या दोघांचा हा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओत वारकऱ्यांप्रमाणेच फेटा बांधल्याचं दिसतं आहे तर अमृता फडणवीस या पैठणी नेसल्या आहेत आणि दोघंही हात जोडून शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हे पण वाचा- Like Mother like Daughter! अमृता फडणवीस अन् लेक दिविजाचा Same to Same लूक, पाहा ग्लॅमरस फोटो

अमृता फडणवीस यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यावर विविध कमेंटस येत आहेत. अमृता फडणवीस या इंस्टाग्रामवर चांगल्याच सक्रिय आहेत. त्या अनेकदा विविध प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. तसंच एक्स या सोशल मीडिया साईटवरही त्या कायमच सक्रिय असतात. आज त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओची चर्चा होते आहे.अमृता फडणवीस या एक बँकर आहेत, शिवाय त्या गायिकाही आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विविध प्रकारची गाणी म्हटली आहेत. त्यांचे म्युझिक अल्बमही आहेत.

मागील वर्षी कार्तिकी एकादशीला देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी विठ्ठलाची पूजा केली होती आणि आरतीही केली होती. (फोटो सौजन्य-अमृता फडणवीस, इंस्टाग्राम)

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच अभंगाच्या ओळी पोस्ट करत महाराष्ट्राच्या जनतेला देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis and his wife amruta gave aashadhi ekadashi wishes via video scj