Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 54 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्यातील आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रमुख नेते आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे.

Read More
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Photo - Govind Dev Giri Maharaj FB page)
Swami Govind Dev Giri: ‘छत्रपती शिवरायांनी त्याकाळी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’, स्वामी गोविंददेव गिरी यांचे विधान

Swami Govind Dev Giri on Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली की, सूरतेवर स्वारी केली? यावरून राजकीय वाद उठला असताना आता स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी वेगळेच विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. (PC : Devendra Fadnavis, @PrabuNatarajan4/X)
Devendra Fadnavis : फडणवीसांकडून राजमाता जिजाऊंची कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी तुलना? शरद पवार गटाने बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत सुनावलं

Devendra Fadnavis vs Bal Thackeray : शरद पवार गटाने देवेंद्र फडणवीसांचा दावा खोडून काढणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

देवेंद्र फडणवीसांचं 'त्या' विधानावर स्पष्टीकरण! (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Devendra Fadnavis on Shivaji Maharaj: “माझं एकच म्हणणं आहे की…”, देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीबाबत केलेल्या विधानावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत महत्वाचा निर्णय, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजना’ अर्ज प्रक्रियेत मोठा बदल; आता फक्त ‘या’ कर्मचाऱ्यांना दिले स्वीकारण्याचे अधिकार!

महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विदेशी गुंतवणुकीवरून वाद,७० हजार कोटी आल्याचा फडणवीस यांचा दावा; आकडेवारी फसवी, विरोधकांचे प्रत्युतर ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
विदेशी गुंतवणुकीवरून वाद,७० हजार कोटी आल्याचा फडणवीस यांचा दावा; आकडेवारी फसवी, विरोधकांचे प्रत्युतर

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) महाराष्ट्राने थेट विदेशी गुंतवणुकीत पहिले स्थान कायम राखले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली की स्वारी? यावरून आता दोन्ही पक्षात जुंपली आहे. (Photo - Loksatta Graphics Team)
Chhatrapati Shivaji Maharaj looted Surat: छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती? राष्ट्रवादी – भाजपामध्ये ‘खंडणी’ शब्दावरून जुंपली

Devendra Fadnavis vs Jayant Patil: छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही, सुरतेवर स्वारी केली, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर भाजपाने टीका केली.

आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला ( फोटो - संग्रहित )
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावरही टीकाही केली होती. या टीकेलाही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.

शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? जयंत पाटलांचं सूचक विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Jayant Patil : सुप्रिया सुळे की जयंत पाटील? शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? जयंत पाटील म्हणाले, “त्यांचा निर्णय…”

गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना थेट सवाल (फोटो-प्राजक्ता राणे, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)
Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही, सुरतेवर स्वारी केली. आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत? असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला.

महायुती व मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. (PC : Devendra Fadnavis/FB)
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? फडणवीसांनी सांगितली NDA ची रणनिती

Devendra Fadnavis Mahayuti : फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय आमच्या स्तरावर घेतला जात नाही”.

धुसफूस रोखण्यासाठी महायुतीचा मोठा निर्णय, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Devendra Fadnavis : धुसफूस रोखण्यासाठी महायुतीचा मोठा निर्णय; ‘आता तीनही पक्षांच्या…’; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. आता या घडामोडींबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करत महायुतीने एक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या