राज्यात अभूतपूर्व असे जलसंकट आणि दुष्काळी परिस्थिती आहे. यातील काही भाग निसर्गनिर्मित असला तरी हे संकट मानवनिर्मितही आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणातून विकेंद्रित जलसाठे निर्माण करण्याची योजना राबवण्याची सूचना केली होती, पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी ती पुढे राबवली नाही. त्यावेळी विकेंद्रित जलसाठे निर्माण केले गेले असते, तर आज ही वेळ आली नसती, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे बोलताना केली.
येथील सायन्स कोअर मैदानावर कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शन आणि कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रत्येक भागात बंधारे, नदीनाल्यांमधून पाणी अडवले गेल्यास हा प्रश्न सुटू शकतो असे त्यांनी सांगितले.