अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरोधात लढा देणारे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते आज (शनिवारी) डॉ. दाभोलकरांची कन्या मुक्त दाभोलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आयुष्यभर अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा-रूढींविरोधात लढा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कार्याला पद्मश्री पुरस्काराच्या रूपाने आदराची पावती मिळाली आहे. अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांच्या विरोधात असल्यामुळे गेल्याच वर्षी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. या सोहळ्यात देशातील १२७ जणांना विविध क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणारे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समित्यांचे सदस्य राहिलेले डॉ. माशेलकर हे केंद्र सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालकही होते. याआधी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. माशेलकर यांच्यासह महाराष्ट्रातील २१ जणांचा पद्मविजेत्यांच्या यादीत समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar honoured with padma shri award