वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने साधूवर हल्ला केल्याने त्याचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. गुप्तधनापोटी मुलाला मारले असावे, असा गावकऱ्यांचा संशय आहे. मृत मुलाचे नाव महेश उगले, असे आहे. या घटनेनंतर औरंगाबाद ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी हर्ष पोतदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र मुलाचा खून कोणत्या कारणाने झाला, याबाबत साशंकता असल्याचे सांगितले. या घटनेमुळे वैजापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2015 रोजी प्रकाशित
आठ वर्षांच्या मुलाचा साधूकडून खून
वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला.
Written by मंदार गुरव
First published on: 20-12-2015 at 02:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight years old child murder in bijapur