"मी मरेपर्यंत...", गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले... | eknath khadse reaction on girish mahajan statement about stop election campaign and rest rmm 97 | Loksatta

“मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
एकनाथ खडसे व गिरीश महाजन ( फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेही पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. एकनाथ खडसेंनी आता प्रचार थांबवला पाहिजे, त्यांनी आराम करावा, अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजनांनी खडसेंना उद्देशून केली होती.

गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, “गिरीश महाजन यांना आता माझी भीती वाटायला लागली आहे. म्हणून ते माझा प्रचार थांबवा, असं म्हणत आहेत. मी मरेपर्यंत राजकारणी राहणार आहे आणि मरेपर्यंत मी राजकारणात सहभागी होणार आहे. जोपर्यंत माझा आवाज बुलंद आहे, तोपर्यंत मी थकणारा नाही. मी जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने संघर्ष केला आहे, मी लढणार आहे.”

हेही वाचा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: फडणवीसांची अमित शाहांशी फोनवरून चर्चा , नेमकं काय बोलणं झालं?

“मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालेला माणूस नाही. कुणाच्या मागे उभं राहून टिव्हीवर माझं चित्र आलं पाहिजे, असं मी कधीही केलं नाही. मी कुणाच्या मागे उभा राहिलो नाही. लोक माझ्या मागे उभे राहिले आणि ते टिव्हीवर झळकले. त्यांची लाचारी असते. मी लाचार नाही. मी विश्वासाने जगणारा माणूस आहे. त्यामुळे मी लढत राहणार,” असं प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी दिलं आहे.

हेही वाचा- “शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?” सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला

गिरीश महाजनांना उद्देशून खडसे पुढे म्हणाले, “यांच्या वडिलांना म्हातारपण आलं नसेल का? किंवा माझ्या आई-वडिलांना म्हातारपण आलं नाही का? यांना म्हातारपण येणार नाही का? यांनाही म्हातारपण येणारच आहे. पण मन तरुण लागतं,” असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 21:25 IST
Next Story
“शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?” सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला