विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून राज्यात नवं महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री असलेल्या राज्याला ३९ मंत्रीही मिळाले आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. मात्र, संधी न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. महायुतीतील तिन्ही घटकपक्षातील अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातीलही काही आमदारांचं नाराजीनाट्य समोर आलंय. विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनीही त्यांची नाराजी उघड केलीय. या नाराजीनाट्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पदे येतात जातात. ज्या आमदारांना मंत्रीपद दिलंय त्यांच्यात क्षमता आहे आणि ज्यांना दिलं नाहीय त्यांच्यात क्षमता नाही, असं म्हणायचं कारण नाही. आमच्याकडे संख्या जास्त आहे, काहीवेळा काही लोकांना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. जे आमदार आता पहिल्या टप्प्यात मंत्री बनले नाहीत, ते पक्षाचं आणि संघटनेचं काम करतील. त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी देऊन पहिल्या टप्प्यातील आमदारांना तेव्हा पक्षाचं काम करायला सांगू. हे रुटीन आहे. हीच कामाची पद्धत आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांची समजूत काढली आहे.

हेही वाचा >> Kalyan Society Dispute : कल्याण मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट; सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हणाले, “मारहाण झाली त्याची आई-बायको…”

“विजय शिवतारेंनी येऊन मला सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी या पदाशिवाय मला दुसरं काही नको. हेच सर्वांत मोठं पद आहे. प्रकाश सुर्वेंनीही मला येऊन सांगितलं. नरेंद्र भोंडेंकर यांनीही सांगितलं. पण हे लोक आता पुन्हा जोमाने काम करणार. आमची जबाबदारी आता वाढली आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. “पदे येतात जातात, पदापेक्षा आपलं उत्तरदायित्व आपलं लोकांशी नाळ जोडली आहे त्यांच्याबरोबर आहे. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे महत्त्वाचं आहे”, असंही ते म्हणाले.

कल्याणच्या घटनेवर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावर भाष्य केलं असून यावर कारवाई करणार आहे. आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहतात. स्थानिक नेते तेथे पोहोचले. तेथे गंभीर दखल स्थानिक नेत्यांनी घेतली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde suggest angry mla to wait and watch for second cabinet expansion sgk