कोल्हापुरातील रमणमळा परिसरातील दोन गटांमध्ये असलेल्या पारंपरिक वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी झालेल्या गोळीबारामध्ये एकजणाचा मृत्यू झाला. रमणमळा परिसरात तरुणांच्या दोन गटांमध्ये शुक्रवारी दुपारी बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान पुढे गोळीबारामध्ये झाले. एका गटातील व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दुसऱया गटातील एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला. डोक्यात गोळी लागल्यामुळे एकजण मृत्युमुखी पडला. जखमी झालेल्या दुसऱया व्यक्तीला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2013 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात पारंपरिक वैमनस्यातून गोळीबारात एकाचा मृत्यू
कोल्हापुरातील रमणमळा परिसरातील दोन गटांमध्ये असलेल्या पारंपरिक वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी झालेल्या गोळीबारामध्ये एकजणाचा मृत्यू झाला.
First published on: 24-05-2013 at 03:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in kolhapur one person may be died in firing