VIDEO: उद्याच बहुमत चाचणी होणार; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपाच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी

सुप्रीम कोर्टानं निकाल सुनावल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी मोठी घोषणाबाजी केली आहे.

Uddhav Thackeray Government Updates: राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका फेटाळली असून उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम याचिका करत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने संध्याकाळी ५ वाजता याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल साडे तीन तास सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु होता. यानंतर ९ वाजता सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला.

सुप्रीम कोर्टानं हा निकाल सुनावल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी मोठी घोषणाबाजी केली आहे. त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या आहेत. त्यांचा घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शेअर केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Floor test will take place tomorrow bjp mlas shout slogans after supreme court decision viral video rmm

Next Story
‘औरंगाबाद शहर हे औरंगाबादच!’ राज्य सरकारच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील यांनी मांडली भूमिका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी