कराड : कराड शहराच्या विकासासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी १० कोटी रूपयांचा निधी राज्याच्या नगरविकास खात्याकडून खेचून आणला. ऐन गणेशोत्सवात हा निधी मिळाल्याने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे सांगत सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणारे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी शहरात ४२ हजार मोदकांचे वाटप केले.
राज्य शासनाकडून मंजूर १० कोटींच्या निधीतून बगीचे, स्मशानभूमी विकसित करणे, पालिकेच्या आरक्षण क्र. १६ मधील खेळाचे मैदान विकसित करणे, पालिका प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण, अभ्यासिका बांधणे, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे. श्री गणेशाचे आगमन आणि निधी मंजूर झाल्याचा आनंद यामुळे सुहास जगताप यांनी स्वखर्चाने दत्त चौक, सोमवार पेठ, जोतिबा मंदिर आदी प्रमुख ठिकाणी प्रत्येकी २१ मोदकांचे दोन हजार बॉक्स नागरिकांना वाटप केले.
११ वर्षे मोफत रिक्षा उपक्रम
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या योजना घराघरात पोहोचवण्याचे काम सुहास जगताप मित्र परिवार करते. गणेशमूर्ती घरापर्यंत नेण्यासाठी गणेशभक्तांसाठी मोफत रिक्षासेवा देण्याचा उपक्रम जगताप गेली ११ वर्षे राबवत आहेत. त्यांच्याकडून यावर्षी ३० मोफत रिक्षांची सोय झाली होती.