कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.Read More
सत्यजितसिंह पाटणकरांनी जनतेच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपत प्रवेश केल्याने त्यांच्या मागण्यांना केंद्रीय व राज्याचे नेतृत्व न्याय देईल. भाजपत ज्या विश्वासाने…
ऑलिम्पिकवीर मल्ल खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनातर्फे उभारल्या जाणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल…
सामाजिक सेवा कार्यातील मंडळींनी आपल्या देशाचा लौकिक वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव…
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली.