तासगांव तालुक्यातील मणेराजूरी येथे पोहण्यास शिकत असताना मुलीचा पाण्यात बुडून मंगळवारी मृत्यू झाला. अक्षता दशरथ लांडगे (१५) ही मुलगी घरामागील शेततळ्यात वडील व भावासह पोहण्यासाठी उतरली होती. वडील दशरथ, भाऊ अक्षय आणि चुलत भाऊ संकेत हे तिघे जण या वेळी शेत तळ्यात तिच्यासोबत होते.
तिला पोहायला शिकविण्यासाठी कंबरेला प्लॅस्टिकचे कॅन बांधण्यात आले होते. मात्र कॅनची दोरी सुटल्याने ती पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. वडील व दोन भावांनी तिला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र ती बेशुद्ध पडली. उपचारासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. याबाबत तासगांव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, खंडेराजूरी येथे नीता अभिजित चौगुले (२७) ही महिला रानात कामासाठी गेली असता चक्कर आल्याने पडली. उपचारासाठी तिला तिच्या पतीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2014 रोजी प्रकाशित
पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू
तासगांव तालुक्यातील मणेराजूरी येथे पोहण्यास शिकत असताना मुलीचा पाण्यात बुडून मंगळवारी मृत्यू झाला. अक्षता दशरथ लांडगे (१५) ही मुलगी घरामागील शेततळ्यात वडील व भावासह पोहण्यासाठी उतरली होती. वडील दशरथ, भाऊ अक्षय आणि चुलत भाऊ संकेत हे तिघे जण या वेळी शेत तळ्यात तिच्यासोबत होते.

First published on: 14-05-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl drowns in pond