girl student died in nanded district due to lightning strike zws 70 | Loksatta

नवरात्रोत्सवात पावसाचा तडाखा ; वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू

विद्यार्थिनी संस्थेतून आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकाकडे येत असताना अंगावर वीज कोसळून मरण पावली

नवरात्रोत्सवात पावसाचा तडाखा ; वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू
प्रतिनिधिक छायाचित्र

नांदेड : नवरात्रोत्सवाचा जागर शहर व जिल्हाभर सुरू असतानाच मागील तीन दिवसांपासून नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांना पावसाचा आणखी एक तडाखा बसला आहे. बुधवारी पावसासोबतच ठिकठिकाणी विजा कोसळल्यामुळे धर्माबादमध्ये एक विद्यार्थिनी मरण पावली. दुसरया एका दुर्घटनेत एक तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला.

धर्माबाद येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी स्वाती कामाजी आवरे (वय १५) ही विद्यार्थिनी संस्थेतून आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकाकडे येत असताना अंगावर वीज कोसळून मरण पावली. त्याआधी नायगाव तालुक्यातील केदार वडगाव येथे एका माळरानावर प्रदीप दशरथ गायकवाड हा शेतकरी वीज पडून जखमी झाला. याच दुर्घटनेत एक गायही मृत्युमुखी पडली. नायगाव तालुक्यातील धानोरा येथे खंडोबा मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने कळस कोसळला, पण या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

बुधवारी दुपारी नांदेड शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर सायंकाळी पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आधी जोरदार पाऊस झाला होता. तेव्हापासून हे सत्र कायम आहे. गुरुवारी वरुणराजाने दिवसभर विश्रांती घेतली होती. दुसरा अपघात वाळूज परिसरात घडला असून यामध्ये ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगला विठ्ठल शहाणे (वय ६२) या मृत महिलेचे नाव असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले. मंगला शहाणे या पहाटे वाळूज परिसरातील पंढरजवळून पायी जात असताना त्यांना एका ट्रकने उडवले. त्यांनाही घाटीमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या “आपला निर्णय…”

संबंधित बातम्या

Maharashtra Karnataka Dispute : ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा…’; राज ठाकरेंचा सूचक इशारा!
“तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”
“तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”
VIDEO: भाषण करताना स्टुलवर उभे राहिल्याने मनसेची टीका, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “माझ्या पायाखाली…”
Maharashtra Breaking News Live : सीमाप्रश्नावर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा; वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!
“बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगावं की…”; सामाजिक वातावरण बिघडतंय म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
उघड्या मॅनहोलची समस्या : अनुचित प्रकार घडल्यास महानगरपालिकेला जबाबदार धरणार; उच्च न्यायालयानचा इशारा
Vidoe: घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा प्रेमात, गर्लफ्रेंडचा हात पकडून कार्यक्रमात आला अन्…
Delhi MCD Election Result : अनेक मंत्री- सहा मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांची फौज उतरवूनही दिल्लीत भाजप पराभूत