विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी आमदार अपात्रताप्रकरणी महत्त्वाचा निकाल सुनावला. तसंच, मूळ शिवसेनेचा दर्जाही शिंदे गटाला दिला. यावरून ठाकरे गटात अद्यापही खदखद सुरू आहे. नाशिकमध्ये झालेल्या जाहीरसभेतही उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांचा एकेरी उल्लेख करून आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जमलेल्या लोकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हीच मला सांगा की मी एकतरी बाळासाहेबांचा विचार सोडला आहे का? तुम्ही म्हणाल तर मी आहे ते पदही सोडायला तयार आहे. जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं.

पुढे ते म्हणाले, जा त्या लबाड नार्वेकरला सांगा, हिंमत असेल तर येथे ये आणि सांग शिवसेना कोणाची? बंद दाराआड निर्णय देता. आम्ही सर्व पुरावे जनता न्यायालयात दिले आहेत. शिवसेनेची घटना मिळालीच नाही असं म्हणणारे गृहस्थच तिथे २०१३ साली उभे होते. हे आता म्हणतायत मी पक्षप्रमुखच नाही. पण तेच त्यावेळी दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा >> Uddhav Thackeray Sabha: “BJP म्हणजे भेकड जनता पार्टी! आमची सत्ता आल्यावर…”, उद्धव ठाकरेंची टीका

“लोकांचे आशीर्वाद हीच माझ्या शिवसेनेची घटना आहे. भाजपाकडे शंकराचार्यांना मान नाही, मित्रांना स्थान नाही. आज बाळासाहेबांचे विचार सोडले असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी शिवेसनेशी युती का तोडली?” असा सवालही ठाकरेंनी विचारला.

“नाथाभाऊंनी नाशिकमध्येच सांगितलं आहे. मे २०१४ पर्यंत आग मेरे गले लग जा अशी परिस्थिती होती. राष्ट्रपतींच्या पाठिंब्याच्या पत्रावर सही करायला मी दिल्लीत गेलो होते. जूनचा महिना होता. तोपर्यंत शिवसेना हिंदुत्त्ववादी होती. मग जून ते ऑक्टोबर आम्ही असं काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनाबरोबरची युती तोडली”, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा >> Uddhav Thackeray Sabha Nashik : “अमित शाह यांनी वचन पाळलं असतं तर देवेंद्र फडणवीस..”, उद्धव ठाकरेंचा घणाघात

बाळासाहेब नाही राहिले…

“भाजपाची एक जबाबदार व्यक्ती आहे. २०१४ ला भाजपाने युती तोडल्यानंतर शिवसेनेचे ६३ आमदार महाराष्ट्राने निवडून दिले. निवडणुका झाल्यानंतर तीच जबाबदार व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी स्वच्छ शब्दांत सांगितलं की त्यांना माझं अभिनंदन करायचं आहे. दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की बाळासाहेब तर नाही राहिले. त्यांना असं वाटत होतं की बाळासाहेब गेले. पण आजही बाळासाहेब आमच्या मनात आहेत. पण २०१४ साली दिल्लीत हा विचार चालला होता की बाळासाहेब नाही राहिलेत, तर उद्धव ठाकरे काय करू नाही शकणार. त्यामुळे शिवसेना संपवण्याचा आदेश देण्यात आला. पण तुम्ही कमाल केली. तुमचे ६३ आमदार आले. २०१४ साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा सुरू होती”, अशी कटू आठवणही उद्धव ठाकरेंनी आज सांगितली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go tell those lying narvekar uddhav thackerays direct challenge said scratching the beard sgk
First published on: 23-01-2024 at 20:53 IST