ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मतदारांना जाहीर धमकी दिलेल्या नांदगावानेही आपला कौल दिला आहे. नितेश राणे यांना आपला गड राखण्यात यश मिळालं आहे. सरपंचपदासह पाच जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावाचा मी विकास करेन. पण जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर निधी देणार नाही अशी धमकीच नितेश राणे यांनी दिली होती. कणकवलीत बोलताना नितेश राणे यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Gram Panchayat Election Result 2022 Live: पाहा निकालाचे प्रत्येक अपडेट

“जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर…”, नितेश राणेंची मतदारांना जाहीर धमकी, म्हणाले “मुख्यमंत्रीही मला विचारल्याशिवाय…”

या विजयानंतर नितेश राणे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला असून सिंधुदुर्ग भाजपाचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं आहे. “सिंधुदुर्ग हा भाजपाचा बालेकिल्ला असेल. विकास कऱण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नसेल हे जनतेने दाखवून दिलं आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत. यापुढे कोकणातील सर्व निवडणुका भाजपा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच नांदगावमध्ये विकास झाला की नाही हे पाहण्यासाठी सहा महिने थांबा असंही म्हणाले.

नितेश राणेंनी काय धमकी दिली होती?

“चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. तितकी काळजी मी नक्कीच घेईन. आता याला हवं तर धमकी किंवा काही समजा. पण आपलं गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा,” असा इशाराच नितेश राणे यांनी नांदगावमधील मतदारांना दिला होता.

पुढे ते म्हणाले होते “सगळा निधी आता माझ्या हातात आहे. मग तो जिल्हा नियोजन निधी असो किंवा ग्रामविकास किंवा केंद्राचा निधी असो. मी सत्तेत असणारा आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat election result 2022 bjp nitesh rane wins in nangaon sgy