आठवडाभरापूर्वीच झालेल्या गारपिटीने केज, अंबाजोगाई , माजलगाव , बीड तालुके झोडपून काढले होते. त्याचे पंचनामे होत नाही तोच शनिवार अरणविहीरा, तागडखेल, देऊळगाव घाट कारखेल, घाटा पिंपरी, देवळाली,गहूखेल धामणगाव म्हसोबाचीवाडी, वेलतूरी ( ता. आष्टी ) सह परिसरात सायंकाळी अक्षरशः गारांचा वर्षाव झाला. दोन तास झालेल्या गारपिटीने ठिकठिकाणी गुडघ्या एवढा थर साचला होता. या गारपिटीमुळे शेतपिकांचं मोठ नुकसान झालं असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
हेही वाचा – VIDEO : “कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले”; अमरावतीत राणा दाम्पत्यासमोरच घोषणाबाजी!
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शनिवार सायंकाळी प्रचंड गारपीट झाली. यावेळी एक फूट बर्फाचा थर साचल्याने हिमालयसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या गिरपिटीमुळे या भागातील शेती पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
आष्टीबरोबरच अरणविहीरा , तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी , चिंचेवाडी, म्हसोबाचीवाडी, कारखेल , धामणगाव या परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह प्रचंड गारांचा वर्षाव झाला. या कांदा, गहू व भाजीपाला ही पिके हातातून गेली आहेत. तर या परिसरातील डाळींब, संत्रा, सह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून झाडेही उन्मळून पडली. अवकाळी गारांच्या पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.