how cybercriminal uses loan app to dupe users : गेल्या काही दिवासांपासून सायबर फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. गुन्हेगार लोकांनी फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. यादरम्यान पाकिस्तानी फोन नंबरवरून सततचे फोन कॉल, मॉर्फ केलेले नग्न फोटो तुमच्या संपर्कातील लोकांना पाठवण्याची धमकी अशा वेगवेगळ्या प्रकारे सायबर गुन्हेगारांकडून असंख्य लोकांना लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या माध्यामातून कर्ज घेणाऱ्या वापरकर्त्यांना सायबर गुन्हेगारांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
तक्रारदार देणाऱ्या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून वैयक्तिक कर्ज देण्याबाबत एक मेसेज पाठवण्यात आला होता. या काळातच तक्रारदाराला पैशांची गरज असल्याने त्याने ५,००० रुपयांचे कर्ज घेतले
या प्रकरणातील आरोपी इसाकी राजन थेवर असून हा २९ वर्षीय व्यक्ती मुंबईचा रहिवासी आहे आणि तो मूळचा तामिळनाडूचा आहे .
या आरोपीला पिंपरी चिंचवड सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली आहे, तसेच या आरोपीचे सिंगापूर आणि चीन या देशांमधील आंतरराष्ट्रीय ऑपरेटीव्हजशी संबंध देखील समोर आले आहेत. महाळुंगे येथील रहिवाशाच्या तक्रारीवरून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसात त्याला कर्जाची व्याजासकट परतफेड करण्यासाठी वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून अनेक कॉल करण्यात आले, ज्यामध्ये पाकिस्तान कंट्री कोड +92 असलेल्या क्रमांकांचाही समावेश होता.
फोन करणाऱ्याने त्या व्यक्तीला धमकावले इतकेच नाही तर कर्ज परतफेडीचा भाग म्हणून त्याला ९,००० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले आणि आणखी पैशांची मागणी करत राहिला.
फोन करणाऱ्याने नंतर तक्रारकर्त्याकडे आणखी १५,००० रुपयांची मागणी केली आणि जर ते दिले नाहीत तर मॉर्फ केलेले न्यूड फोटो त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवण्याची धमकी देखील दिली.
तपासात समोर आले की, तक्रारकर्त्याला जे लोन अॅप खोटे बोलून डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले, त्याच्या माध्यमातून आरोपीने त्याची कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोटोचा एक्सेस मिळवला होता. या संबंधीची परवानगी असे अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल करतानाच विचारली जाते.
जेव्हा तक्रार करणाऱ्या व्यक्तीने १५,००० रुपये देण्यास नकार दिला तेव्हा मॉर्फ केलेले न्यूड फोटोस पीडित व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवण्यात आले. त्यानंतर या व्यक्तीने सायबर क्राईम सेलशी संपर्क साधला.