तुळजापूर: धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नळदुर्ग व तुळजापुरात स्मारक व्हावे, यासह अन्य मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीने सोमवारी तुळजापूर शहरात विराट मोर्चा काढण्यात आला. जुना बसस्थानक चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक, भवानी रोड, महाद्वार रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय येथून येऊन जुना बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोर्चात डोक्यावर पिवळी टोपी घालून धनगर समाजबांधव सहभागी झाले हहोते. दरम्यान धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तुळजापूर व नळदुर्ग शहरात उभारावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

हेही वाचा >>>> रजत नगरी खामगावचा ‘तेजोमय विक्रम’! साकारली १०५ किलो चांदीची गणेश मूर्ती; जालन्यात होणार विराजमान

मोर्चात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह डॉ. जितेंद्र डोलारे, बालाजी बंडगर, बाबा श्रीनामे, समाधान देवगुंडे, चेतन बंडगर, राम जवान, ज्ञानेश्वर घोडके, गणेश सोनटक्के, अण्णा बंडगर, सुरेश कोकरे, देविदास पाटील, प्रमोद दाणे, सुदर्शन पांढरे, गणेश सोनटक्के आदी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

समाजाच्या मागण्या रास्तच!

धनगर समाजाला आरक्षण मिळणे रास्त आहे. तसेच तुळजापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागेत उभा केला जाईल. त्यासाठी ५० लाख रूपंयाचा निधी देण्याचा शब्द आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. अहिल्यादेवी  होळकर यांचे आजोळ असलेल्या चोराखळी येथे स्मारक, शिक्षणासाठी अद्यावत अभ्यासिका व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोर्चेकर्‍यांना सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Include dhangar community in scheduled tribes virat morcha and rasta roko in tuljapur ysh