छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीसाठी अपक्ष आमदार महेश बालदी यांचा पाठिंबा

छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले

Independent MLA Mahesh Baladi support for Chhatrapati Sambhaji Raje Rajya Sabha candidature

छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पहिली सही केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार, अशी घोषणा करताच महाराष्ट्रातून पहिला पाठिंबा उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी जाहीर केला.

सोमवारी छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरी केली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले. तसेच राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Independent mla mahesh baladi support for chhatrapati sambhaji raje rajya sabha candidature abn

Next Story
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची संवेदनशीलता; अपघातग्रस्त व्यक्तीला सुरक्षेसाठी असलेल्या गाडीतून पाठवले रुग्णालयात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी