जालना : सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी जालना जिल्ह्‌यातील सौंदलगाव फाट्याजवळ झालेल्या अप‌घातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रोहिणी अमरदीप चव्हाण (30) आणि नुरवी अमरदीप चव्हाण (अडिच वर्षे) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकींची नावे आहेत.

या अपघातात अमरदीप बाबूराव चव्हाण (४०), विश्रांती प्रदीप चव्हाण (२९) आणि रुद्रांश प्रदीप चव्हाण (2 वर्ष) हे तिघे जखमी झाले आहेत . अपघाताची माहिती मिळताच परिसरातील रहिवाश्यांनी धाव घेतली आणि त्यांच्या मदतीने जखमींना जवळ असलेल्या पाचोड गावातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले .

अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या समजू शकले नाही. परंतु कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे . कार उलटल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे.