लातुरमध्ये लग्नसमारंभात विषबाधा, २५० जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार

लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील साकोळ जवळगा येथील मुलाचा निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीशी विवाह झाला.

food poisoning
सांकेतिक फोटो

लातूर : निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या लग्नसंरभात जवळपास २५० जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले. या विषेबाधेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र लग्नसमारंभासारख्या शुभकार्यामध्ये विषबाधा झाल्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांत वाढ; मुंबई महापालिकेकडून सतर्कतेचं पाऊल, केली ‘ही’ तयारी

मिळालेल्या माहितीनुसार लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील साकोळ जवळगा येथील मुलाचा निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथिल मुलीशी 22 मे रोजी विवाह झाला. या लग्नसोहळ्याला केदारपूर, अंबुलगा, सिंदखेड आधी गावातील वर्‍हाडी मंडळी आली होती. लग्नसोहळा पार पडल्यानंतर या वऱ्हाडी मंडळीने भोजन केले. मात्र काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागले तसेच उलट्या, जुलाबचा त्रास सुरु झाला.

हेही वाचा >>> इंधन दरकपातीवरुन देवेंद्र फडणवीस पुन्हा आक्रमक; राज्य सरकारवर केली गंभीर टीका, म्हणाले ‘लज्जास्पद…’

जेवणानंतर उलटी तसेच जुलाबचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णांना वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधेमुळे सुमारे 250 जणांवर उपचार करण्यात आले. तसेच यशस्वी उपचार केल्यानंतर सर्वांना घरी पाठवण्यात आले. विषबाधा गंभीर स्वरुपाची नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका नाही असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latur district 250 people face food poisoning problem in marriage function prd

Next Story
जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांत वाढ; मुंबई महापालिकेकडून सतर्कतेचं पाऊल, केली ‘ही’ तयारी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी