पोटच्या मुलीवरच पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोल्हापूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलीच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तर ५ ते ६ वर्षांपूर्वी या नराधमाच्या मुलीचेही लग्न झाले होते आणि ती सासरी गेली होती. मात्र तिला तिच्या नवऱ्याने सोडून दिल्याने काही गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या वडिलांसोबत राहात होती. तिच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्या नराधम बापाने तिच्यावर मागील दोन महिन्यांपासून अत्याचार केले.
पीडिता झोपेत असताना त्याने बलात्कार केला आणि त्यानंतर याचे प्रमाण वाढले. सगळा अन्याय असह्य झाल्याने या पीडितेने स्थानिक नगरसेविका रेखा आवळे यांची मदत घेतली. आपल्यावर रोज होणाऱ्या अत्याचारांची माहिती तिने रेखा आवळे यांना दिली. ज्यानंतर या सगळ्या प्रकरणाची दखल घेत रेखा आवळे यांनी पीडितेसह पोलीस ठाणे गाठले.
या सगळ्या महिला पीडित मुलीला घेऊन तिच्या घरी गेल्या असता तिच्या नराधम बापाने पुन्हा एकदा तिला सगळ्यांसमोर मारहाण केली. त्यानंतर मात्र रेखा आवळे यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी या नराधमाला अटक केली. आज या नराधम बापाला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात एकूण ६ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. सगळे पुरावे आणि पीडितेची अवस्था लक्षात घेऊन कोर्टाने ही तिच्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुली यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. अशात कोल्हापुरात घडलेल्या या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्याने समाधान व्यक्त होते आहे. आरोपीने स्वतःच्याच मुलीवर निर्दयीपणे बलात्कार केला हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे त्यामुळे आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी केली. ज्यानंतर या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.