पत्नीस नांदावयास पाठवत नसल्याने सुरू असलेले भांडण सोडवण्यास मध्ये पडलेल्या सासूचा जावयाने चाकूने भोसकून खून केला. निलंगा येथे गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. आरोपीस ५ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
घुडुसाब अजिजसाब बागवान (वय ४२, कासारशिरसी) याने शहरातील पीरपाशा दर्गा परिसरात नसरीन अखतर फकीर यांच्या घरासमोर रस्त्यावर मुलगा महेबुब यास तू किती दिवस तिकडे राहणार आहेस? माझ्याकडे येणार नाही का? असे विचारत शिवीगाळ करून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घुडुसाबचा मेव्हणा व फिर्यादी इमान चाँदसाब बागवान (वय २५, कुमठा कारला, तालुका औसा) या वेळी मध्ये पडला असता त्याच्या पाठीत चाकूने हल्ला करून जखमी केले. फिर्यादीची आई (आरोपीची सासू) अमीना चाँदसाब बागवान (वय ६५, कुमठा कारला) या वेळी भांडण सोडविण्यास आली असता आरोपीने तिलाही माझ्या बायकोला नांदवण्यास का पाठवत नाहीस, म्हणून रागाच्या भरात चाकूने भोसकून खून केला. इमामच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. आरोपीस निलंगा न्यायालयासमोर उभे केले असता ५ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
सासूच्या खुनाबद्दल जावयास कोठडी
पत्नीस नांदावयास पाठवत नसल्याने सुरू असलेले भांडण सोडवण्यास मध्ये पडलेल्या सासूचा जावयाने चाकूने भोसकून खून केला. निलंगा येथे गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. आरोपीस ५ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
First published on: 03-05-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockup of soninlaw in issue of murder to motherinlaw