Maharashtra, Mumbai Breaking News Updates : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिंमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे,असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला आहे. तर सभेतील गर्दी पाहून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा उसळून बोलले व त्यांच्या प्रत्येक फटकाऱ्यासरशी विरोधकांचे एक-एक दात घशात गेले, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. तर अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगालच्या उपसागरात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेत पूर्ण झाले असून सोमवारी पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates: राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
उरण शहरालगत असलेल्या ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर रविवारी येथील पाण्याच्या हौदाची सफाई सुरू असताना मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर…
अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगालच्या उपसागरात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वाचा सविस्तर…
शिवडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. आरोपीने बनावट स्वाक्षरी करून धनादेशाद्वारे चौधरी यांच्या बँक खात्यातून ७८ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. या धनादेशाची सत्यता पडताळण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता फसवणूक उघडकीस आली. याप्रकरणी आरोपींच्या आणखी एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. वाचा सविस्तर….
ओठांचे चुंबन घेणे आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणे हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला. वाचा सविस्तर…
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.