नागपूरमध्ये एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आशिष उसरे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. ते तो परत करु शकत नव्हता. आर्थिक कोंडी झाल्याने या तरुणाने आत्महत्या केली. गुरुवारी रात्री उशिरा जयवंत नगर भागात असलेल्या राहत्या घरात आशिष उसरे या २६ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

नागपुरात एकाच रात्रीत तीन हत्या झाल्याची घटना गुरवारीच उघडकीस आली होती. एकाच रात्रीत तीन तासांच्या अंतराने तीन हत्या झाल्याची घटना घडली. आता नागपुरात एका तरुणाने स्वतःवर गोळी चालवून आत्महत्या केली आहे. उधारीचे पैसे न चुकवता आल्याने आर्थिक कोंडीतून या तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.