गुरुवारी मांढरदेव डोंगरावर दाट झाडीत खून करण्यात आलेल्या मुलीची ओळख पटली असून या प्रकरणात तपासासाठी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले
मांढरदेव (ता. वाई) येथे काळेश्वरी मंदिराजवळ झाडीमध्ये गुरुवारी सायंकाळी एका मृतदेह आढळून आला होता. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र हाय अलर्ट मोहीम राबविण्यात आली होती. रात्री भुईज पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी काही लोक आले असता त्यांना खून झालेल्या मुलीची ओळख पटली – भारती कादर भोसले (वय १४, सुरूर, ता वाई) ही मुलगी यशवंत शिक्षण संस्था सुरूर येथे आठवीत शिकत असल्याची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी लाकडी ता. इंदापूर येथून एका इसमाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा अंधश्रद्धेचा प्रकार नाही. या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख उपअधीक्षक अमोल तांबे, यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. वेगवेगळ्या टीम करून तपास काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे विकास जाधव, आनंद चिंचकर आदींचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One detained in mandharadeva murder case