पंढरपूर : वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग घटला आहे. वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारे पाणी कमी केल्याने संगम येथील पाण्याची पातळी कमी झाली आहे. तर दुसरीकडे उजनी धरणातून बुधवारी सायंकाळी ६ वाजता ४१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. यामध्ये देखील पाण्याची मोठ्या प्रमाणत घट झाली आहे. तर भीमा नदीत ७२ हजार क्युसेक पाणी प्रवाहित आहे. यामुळे भीमा नदीतील पाणी ओसरू लागल्याने पुराचा धोका टळला आहे.

पुणे जिल्ह्यातून येणारी पाण्याची आवक मंदावली आहे. वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे अकलूज जवळील संगम येथील पाण्याची पातळी कमी आली आहे. तर उजनी धरणातून मंगळवारी सायंकाळी ७२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. बुधवारी यात कमी करून सायंकाळी ६ वाजता ४१ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदीत येणारे पाण्याची आवक मंदावली आहे. मंगळवारी भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी पोहचले असल्याने वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मात्र, बुधवारी दुपारनंतर पाणी ओसरू लागले.

भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील घट झाली आहे. मंगळवारी भीमा नदीत १ लाख पाणी वाहत होते. मात्र, बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७२ क्युसेक पाणी वाहत आहे. पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भीमा नदीतील पाणी सध्या हळूहळू ओसरत आहे. पुराचा धोका टळला असला तर नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.