वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणरी कार्तिकी वारीसाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे. बुधवारपासून विठ्ठल आणि रुक्मिनीमातेचे २४ तास दर्शन भाविकांना गेटा येणार आहे. बुधवारपासून देवाचे नित्योपचार बंद झाले असून प्रक्षाळपूजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी २४ तास उघडे राहील अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे. कार्तिकी एकादशी ८ नोव्हेंबर रोजी आहे.

वारकरी संप्रदायत आषाढी,कार्तिकी,माघी आणि चैत्री वारील अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या भाविकाला आषाढी वारीला पंढरीला येता आले नाही तो भाविक हमखास कार्तिकी वारीला येतो. या कार्तिकी वारीसाठी मुंबई,कोकण,विदर्भ ,मराठवाडा येथून भाविक दरवषी ण चुकता येतो. या कार्तिकी वारीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची तयारी अंतिम त्प्प्यत आली आहे. बुधवारपासून श्री विठ्ठल आणि रुक्मिनिमातेचे दर्शन २४ तास करण्यात आले. बुधवारी महानैवैद्यानंतर विठोबाच्या पाठी मउ , मुलायम तक्या देण्यात आला आहे.तर विठोबाचा शेजघरातील पलंग देखिल काढण्यात आलेला आहे.

विठ्ठलांचे चौवीस तास दर्शन सुरू झाल्यामुळे विठठलांचे दैनंदिन नित्योपचार हे बंद करण्यात येणार आहेत. यामधे काकडआरती तसेच शेजारती,दुपारती,पोशाख हे सर्व उपचार काही दिवस बंद राहणार आहेत. केवळ नित्यपूजा ही केली जाणार आहे. यामधे देवास दररोज महानैवैद्य तसेच लिंबू पाणी देखिल दाखविले जाणार आहे.तसेच चौवीस तास दर्शन सुरू होत असल्यामुळे या काळामधे कुठल्याही प्रकारची व्हीआयपी,तसेच ऑनलाईन दर्शन देण्यात येणार नाही.कार्तिकी वारीतील महत्वाचा दिवस म्हणजेच एकादशी ८ नोव्हेंबरला आहे.