Police Inspector along with Sub Inspector suspended Nandurbar case victim rape murder ysh 95 | Loksatta

नंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित

धडगाव तालुक्यातील खडक्या येथील पीडितेवरील बलात्कार आणि हत्येच्या आरोपप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकासह एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

नंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित
तोतया पोलीस अटकेत ( संग्रहित छायाचित्र )

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील खडक्या येथील पीडितेवरील बलात्कार आणि हत्येच्या आरोपप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकासह एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याआधी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेल्या या दोघांच्या निलंबनाचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी काढले.

मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची पीडितेच्या वडिलांची तक्रार आहे. या प्रकरणी जे. जे. रुग्णालयात कुटुंबीयांच्या मागणीनुसार पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदनदेखील झाले असून न्यायवैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या प्रकरणात याआधी तत्कालीन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची केवळ बदली करून चालणार नाही तर त्यांचे निलंबन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली होती. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्याप्रकरणी तत्कालीन निरीक्षक गोकुळ औताडे आणि उपनिरीक्षक बी. के. महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त

संबंधित बातम्या

“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात
“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं?” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल!
“एक मिनिटात MSMEचा फुलफॉर्म सांगावा, मग…”, नारायण राणेंना राऊतांचे आव्हान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?
‘जा आणि महिलांवर अत्याचार करा, रशियन सैनिकांच्या पत्नींकडूनच प्रोत्साहन,’ युक्रेनच्या ‘फर्स्ट लेडी’चा गंभीर आरोप
“सर्व यंत्रणा एखाद्या अजगराप्रमाणे गिळल्यावर आता न्यायालयेदेखील…”; शिवसेनेकडून केंद्रीय कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
आधी गळा आवळला, मग विटांनी ठेचून खून; चिप्सचं आमिष दाखवून राजस्थानात ९ वर्षीय मुलीला संपवलं
मेन्टॉरशिप : मृणाल कुलकर्णी – ‘नजर’ मिळवून देणारे माझे मेन्टॉर