सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे यांच्या विरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत असल्याने लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.

हेही वाचा >>> Ladki Bahin Yojana : “नवरा सगळा पगार देतो, त्याचं बायको ऐकत नाही तर..?” ‘लाडकी बहीण’वरुन प्रणिती शिंदेंचा सरकारला टोला

सध्या त्याच्या शोधार्थ ७ पथके कार्यरत आहेत. मात्र तो सापडला नसल्याने लुकआऊट नोटीस काढली आहे असे पोलिसांनी सांगितले. मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे या प्रकरणी तपास करत आहेत. सध्या बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिस कोठडी मध्ये आहे. त्याला पोलीस चौकशीसाठी ५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक श्री.कोल्हे म्हणाले, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. शिल्पकार जयदीप आपटे सापडत नसल्याने पोलिस अधीक्षक यांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.