पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवार यांनी यामध्ये म्हटले आहे की, ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बस स्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्टेशनदेखील आहे, तरी एक सराईत गुन्हेगाराकडून अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळावरील महिला सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी करतानाच महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात तात्काळ लागू करण्याबाबत राज्य सरकार आता तरी निर्णय घेईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune swargate bus stop rape case rohit pawar reaction ssb