रायगड – महाड एमआयडीसीतील ॲस्टेक लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये स्फोट झाला. कंपनीच्या के टू डीडीएल प्लांटमध्ये मध्यरात्री छोटे मोठे ६ स्फोट झाले. स्फोट झाल्यानंतर प्लांटमध्ये आग लागली. सुदैवाने आग आणि स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?

हेही वाचा – जत- कवठेमहांकाळ मार्गावर अपघात; ५ ठार, ५ गंभीर

महाड एमआयडीसी, लक्ष्मी ऑरगॅनिक, प्रिव्ही ऑरगॅनिक आणि महाड नगर परिषद अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरीता मोठ्या प्रमाणात फोमचा वापर करण्यात आला. स्फोट झाला तेव्हा कंपनीत २५ कामगार होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad explosion in company in mahad midc no casualty ssb