महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे.
Gudi Padwa Melava 2022: “मशिदीचे भोंगे नाही काढले तर…”; राज ठाकरेंचा इशारा
“माझी पंतप्रधानांना विनंती आहे की ज्याप्रमाणे ईडी भ्रष्टाचाऱ्यांवर धाडी टाकत आहे, त्याप्रमाणे राज्यभरात झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाकायला हव्या. तुम्ही पोलिसांना विचारा, पोलिसांना देखील माहित आहे की तिथ काय चालतंय. भविष्यात कोणती घटना घडेल यासाठी तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील, ज्या निस्तरताना तुमच्या नाकी नऊ येईल,” असं राज ठाकरे म्हणाले.
Poll: जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार हा राज ठाकरेंचा आरोप पटतो का?
आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. तर भाजपावर टीका करणं मात्र टाळलं. त्यांनी उत्तर प्रदेशमधील विकासाचं कौतुक केलं. तसेच मशिदींवर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली.
आ