शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे ( Raj Thackeray) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) ते चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या वक्त्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज ठाकरे सुरुवातीला मराठीचा मुद्दा व नंतर हिंदुत्व, लाऊडस्पीकर आणि मशिदींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.
राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांची मुलगी आहे.
राज ठाकरे यांचे खरे नाव स्वराज श्रीकांत ठाकरे आहे. त्यांची राजकीय कारकीर्द २००६ मध्ये सुरू झाली. राज ठाकरे हे नेहमीच वादात असले तरी २००८ मध्ये त्यांनी छठ पूजेवर वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आले होते. छठपूजा हे नाटक असून उत्तर भारतीयांची मते मिळविण्याची राजकीय पक्षांची केवळ नौटंकी आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. याशिवाय त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांच्या विरोधात २००८ मध्ये महाराष्ट्रात आंदोलनही सुरू केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकारण्यांवर सडकून टीका केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे कोकणवासीयांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे. आता मंगळवारी (१२ सप्टेंबर) मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. हा त्यांचा पाचवा…