राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजा आणि औरंगजेबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरावरून टीका होत आहे. भाजपानेही आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असं आव्हाडांकडू सांगण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “मी असलं घाणेरडं राजकारण कधीही…”, बाळासाहेब थोरात प्रकरणावर नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया!

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

आव्हाडांविरोधात भाजपाही आक्रमक

दरम्यान, आव्हाडांच्या विधानांतर भाजपानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही जितेंद्र आव्हाड सारख्या विकृती महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या होत्या. स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर विचारधाराच काय, प्रसंगी धर्मांतर करून औरंगजेब वारस मीच आहे सांगण्यात देखील कमी करणार नाहीत. आव्हाड सारख्या विकृतीच्या तोंडून महान महापुरुषांची नावे येतात, त्यातून असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, जणू एक थोर समाजसेवकच बोलतो आहे. पण या विकृत वाणाची कथनी वेगळी आणि करणी वेगळी आहे.” असं भाजपाने म्हटलं आहे. तसेच “आव्हाडांची वैचारिकची बोटं छाटायला छत्रपतींचे मावळे महाराष्ट्राच्या भूमीत कायम असणार हे औरंगजेबाच्या वारसदारांनी कायम लक्षात ठेवावं”, असा इशारा भाजपाने दिला आहे.

हेही वाचा – बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा निर्णय घेण्याची वेळ…”

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाल होते?

महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होते. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितलं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे.”, असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje chhatrapati reaction on jitendra awhad statement regarding shivaji maharaj spb
First published on: 07-02-2023 at 12:39 IST