Devendra Fadnavis : राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी आज पुण्यातील बिबवेवाडी येथे आयोजित केलेल्या जैन समाजाच्या बीजीएस नॅशनल कॉन्वेशन येथे हजेरी लावली. तेथे त्यांनी जैन समाजाच्या उदारमतवादी विचारसरणीचं कौतुक केलं. तसंच, भारताच्या जीडीपीमध्ये जैन समाजाचं योगदान असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
“या वर्षी राष्ट्रीय अधिवेशन भारताच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात होत आहे. पुण्याने तुमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं असेल. मी जैन समाजातील कार्यक्रमात जातो तेव्हा मी यासाठी खूश होतो की हा फक्त एका समाजाचा कार्यक्रम नाहीय. भारताच्या जीडीपीमध्ये जैन समाजाची भागीदारी आहे. भारताला अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन इकॉनॉमी करायची आहे, त्याचा रस्ता जैन समाजाच्या माध्यमातून जातो.”
? 2.17pm | 30-11-2024?Bibwewadi, Pune.
LIVE | BJS National Convention Pune 2024@BJS_India#Maharashtra #Pune https://t.co/KKuMvu3PH1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 30, 2024
देणाऱ्यांमध्ये जैन समाजाचं नाव
“भगवान महावीर यांच्या तत्वामध्ये फक्त घेणं नाहीय तर देणंही आहे. जैन समाजाने कायम एक प्रकारे कार्यान्वित केले आहे, त्यामुळे आमचं जैन समाज जेवढं कमावतं त्यापेक्षा त्यांना देणं माहितेय. त्यामुळे देणाऱ्यांध्ये जैन समाजाचं नाव येतं”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.