सोलापूर जिल्ह्य़ात एकीकडे तापमानाचा पारा वाढत चालला असताना दुसऱ्या बाजूला अक्कलकोट व अन्य भागात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. या अवकाळी पावसातच वीज कोसळून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ही घटना घडली.
शिवानंद महादेव बिराजदार (५०, रा. दर्गनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापूर शहराजवळ अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी गावच्या शिवारात शिवानंद हा आपल्या शेळ्या-मेंढय़ा राखण्याचे काम करीत होता. त्यावेळी अचानकपणे अवकाळी पाऊस सुरू झाला. त्याचवेळी आकाशातून विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली. कोसळलेली वीज शिवानंदला चाटून गेल्याने तो धक्का बसून बेशुद्ध पडला. त्यास पुतण्या राजू बिराजदार याने तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2015 रोजी प्रकाशित
सोलापुरात वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्य़ात एकीकडे तापमानाचा पारा वाढत चालला असताना दुसऱ्या बाजूला अक्कलकोट व अन्य भागात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. या अवकाळी पावसातच वीज कोसळून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला.

First published on: 11-04-2015 at 03:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shepherd died due to thunder collapses