शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सचिन मेटे असं विनायक मेटेंच्या पुतण्याचं नाव असून त्यांनी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील राजेगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन मेटे यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. सचिनच्या आत्महत्येची माहिती समोर येताच गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी विनायक मेटे यांचं एका रस्ते अपघातात निधन झालं होतं. दोन महिन्यांपूर्वी या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं. विनायक मेटे यांच्या निधनाने मेटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. यानंतर आता मेटे कुटुंबावर दुसरा आघात झाला आहे. विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा मुलगा सचिन मेटे यांनी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsangram leader vinayak mete nephew sachin mete committed suicide by hanging himself at residence beed rmm