सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका कंटेनरची कारला धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात कारमध्ये बसलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यूमुखी पडलेले चौघे हे लातूरमधील रहिवासी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादमधील अळणी पाटी या भागात हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर घेऊन धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरनं समोरून येणाऱ्या कारला जोरात धडक दिली. एमएच २४ एए ८०५५ असा या कारचा क्रमांक आहे. ही धडक इतकी भीषण होती, की त्याच्या आघातामुळे कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात शिरली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला.

दरम्यान, या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण ही व्यक्ती नेमकी कंटेनरमधील आहे की कारमधील, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur dhule national highway osmanabad accident car collided with container pmw