सातारा : सातारा तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील पांगारे गाव एसटी महामंडळाच्या बस सेवेपासून गेली ७५ वर्षे वंचित होते. अखेर ७० वर्षांची प्रतीक्षा संपली आणि सातारा ते पांगारे एसटी धावली! यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून, ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.
गेली ७० वर्षांपासून पांगारे गावात कधीच एसटी आली नाही. पांगारे व परिसरातील इतर गावांना बससेवा मिळावी, सातारा ते पांगारे मार्गावरील डबेवाडी, अंबवडे खुर्द, भोंदवडे, पोगरवाडी, सोनवडी, गजवडी, बोरणे, सज्जनगड, ज्ञानश्री महाविद्यालय मार्गे पांगारे अशी बससेवा सुरू व्हावी, यासाठी परळी भागाचे नेते राजू भोसले, कर्तव्य सखी मंचच्या अध्यक्षा अश्विनी शेळके व ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे, कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बससेवा सुरू करण्यामध्ये येणारे अडथळे दूर केले. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून, आज ही बससेवा सुरू झाली.
पांगारे येथे पहिल्यांदाच आलेल्या बसचे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व महिला, पुरुष यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी अश्विनी शेळके यांच्या हस्ते एसटीचे पूजन करण्यात आले. ही बस सातारा डेपोतून सकाळी नऊ वाजता निघणार असून, दहा वाजता पांगारेत पोहोचणार आहे. तसेच दुपारी तीन वाजता सातारा डेपोमधून निघून सायंकाळी चार वाजता पांगरे गावामध्ये पोहोचणार आहे.
गेली ७० वर्षांपासून पांगारे गावात कधीच एसटी आली नाही. पांगारे व परिसरातील इतर गावांना बससेवा मिळावी, सातारा ते पांगारे मार्गावरील डबेवाडी, अंबवडे खुर्द, भोंदवडे, पोगरवाडी, सोनवडी, गजवडी, बोरणे, सज्जनगड, ज्ञानश्री महाविद्यालय मार्गे पांगारे अशी बससेवा सुरू व्हावी, यासाठी परळी भागातील नागरिकांनी गेली अनेक वर्षांची मागणी होती. मात्र आजवर एसटी सेव सुरू होण्यास विविध कारणांनी उशीर होत होता. यासाठी परळी भागाचे नेते राजू भोसले, कर्तव्य सखी मंचच्या अध्यक्षा अश्विनी शेळके व ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे, कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बससेवा सुरू करण्यामध्ये येणारे अडथळे दूर केले. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून, आज ही बससेवा सुरू झाली.
