जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर खरेदीदाराचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले पनवेलचे नायब तहसिलदार सुहास खामकर व त्यांचा साथीदार गणेश भोगाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पनवेल तालुक्यातील कोयनावेळे येथे राहणारे कदम यांनी आपली पेंधर व कोयनावेळे येथील जमीन खारघर येथे राहणारे शरद वसंत सावंत यांना ६ सप्टेंबर २०१३ रोजी विकली आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शरद सावंत यांच्या नावाची नोंद व्हावी यासाठी कदम यांनी पेंधर तलाठी कार्यालयात १२ सप्टेंबर रोजी अर्ज केला होता . हे प्रकरण पनवेल तहसिल कार्यालयात आल्यानंतर नायब तहसिलदार सुहास खामकर यांनी या कामासाठी प्रथम १ लाख रूपये मागितले. त्यानंतर ५० हजारांवर तडजोड झाली.
याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने सापळा रचला. खामकर यांनी सोमवारी आपला सहकारी गणेश भोगाडे यांच्याकरवी ही ५० हजारांची लाच स्वीकारली. याप्रकरणी खामकर व त्याचा सहकारी गणेश भोगाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याना अटक करण्यात आली. मंगळवारी या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच . ए. पाटील यांनी या दोघांना २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान सुहास खामकरला मंगळवारी न्यायालयात हजर करणार म्हणून मुंबईतील शरीरसौष्ठवपटू, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2014 रोजी प्रकाशित
लाचखोर सुहास खामकर यास दोन दिवसांची पोलीस कोठडी
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर खरेदीदाराचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले पनवेलचे नायब तहसिलदार सुहास

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-08-2014 at 03:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhas khamkar get two day police custody